महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण ४६४४ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकुण ३६ जिल्हाच्या केंद्रावरऑनलाइन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल.
पदाचे नाव : तलाठी
विभाग :-महसूल व वन विभाग
एकूण रिक्त पदे:- 4644 पदे.
नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र.
शैक्षणिक पात्रता:-
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा
मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिन्दी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदिारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिन्दी
भाषा परीक्षा उत्तीण होणे आवश्यक राहील.
वयोमर्यादा:- खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
मागास प्रवर्ग:- 18 ते 43 वर्षे.
वेतन श्रेणी :- रु, 25,500/- ते रु. 81,100/-.
अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.
नोटीफीकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
परिक्षा दिनांक :- याबाबतची माहिती https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणेत येईल. तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल.
पदाच्या निवडीसाठी कार्यपध्दती, आवश्यक कागदपत्रे तसेच महत्वाच्या अटी व शर्ती (सर्व उमेदवारांसाठी ) :-
1) तलाठी पदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याचेकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
2) तलाठी पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी शासन निर्णय क्र. रिपभ/प्र.क्र / ६६ / २०११ /ई-१० दि. १७ जून २०११ नुसार ज्या परिक्षार्थीकडे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) उपलब्ध नसल्यास त्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याचा जन्म दाखला (Birth Certificate) सादर करणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही. सदर परिक्षार्थीकडे अधिवास प्रमाणपत्र तसेच जन्म तारखेचा दाखला उपलब्ध नसल्यास, त्या परिक्षार्थीने आपला शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक राहील. परंतू सदर शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये त्या परिक्षार्थीचा जन्म हा महाराष्ट्र राज्यात झाल्याची नोंद असणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही. ज्या उमेदवाराचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला नसेल परंतू महाराष्ट्र राज्यातील रहिवास सलग १५ वर्षे व त्यापेक्षा अधिक कालावधीचा आहे अशा परीक्षार्थी / उमेदवारांसाठी अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) आवश्यक राहील.
तलाठी भरती अभ्यासक्रम –
परीक्षा कालावधी :- 2 तास (120 मिनीटे)
परिक्षेचे स्वरूप –
लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक ०२ गुण ठेवण्यात येतील.
तलाठी पदासाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांसाठी शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग – क्र.प्रनि.म. १२१६/प्रक्र६५/१६/१३-अ, दि. १३/०६/२०१८ मधील तरतुदीनुसार तलाठी पदासाठी पदवी ही कमीत कमी अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. परंतु मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शांलात परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) च्या दर्जाच्या समान राहील व लेखी परिक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दीक चाचणी या विषयावरील प्रश्नाकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवून एकुण २०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
FAQ –
Que 1) तलाठी भरती साठी अनलाइन फॉर्म भरताना सर्वसाधारणपणे लागणारे Documents:-
1) Photo (50-200kb)
2) Signature (50-200kb )
3) 10th marksheet / certificate (100kb – 2mb )
4) Degree Certificate (100kb-2mb)
5) Domicile (100kb-2mb)
6) Non Creamy layer/EWS (100kb-2mb)
7) Caste Certificate (100kb-2mb)
8) “ID Proof आधार, पॅन, ड्रायविंग किंवा दुसरं (100kb-2mb)
Que 2) तलाठी परीक्षेसाठी पदवी आवश्यक आहे का?
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा
मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
Que 3) तलाठ्याचा मासिक पगार किती?
रु, 25,500/- ते रु. 81,100/-.
अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
Que 4) तलाठीची परीक्षा इंग्रजी माध्यमात देता येईल का?
मराठी आणि इंग्लिश दोन्ही स्वरुपा मधे प्रश्न असतील उमेदवार आपल्या आवडत्या भाषेमध्ये उत्तर देऊ शकतो.
Que 5) तलाठी परीक्षेत कोणते विषय असतात?
मराठी, इंग्लिश,सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता व अंकगणित. ई विषय असतील.